Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमी'त्या' ३३ विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व, उदय गायकवाड यांचा संकल्प जन्मदिनी पूर्णत्वाला

‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व, उदय गायकवाड यांचा संकल्प जन्मदिनी पूर्णत्वाला

३ जूलै २०२१,
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च व कार्यक्रम टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडलाध्यक्ष उदय दत्तात्रय गायकवाड यांनी जन्मदिनी (दि.२) पूर्णत्वास नेला. छोटेखानी कार्यक्रम घेत त्यांनी कोरोनाकाळात आईवडिलांचे छत्र हरपलेल्या ३३ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

वाढदिवसानिमित्त राघव मंगल कार्यालयात दिघी याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक दत्तात्रय आबा गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेवक विकास डोळस, भाजपा युवा मोर्चा पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, सरचिटणीस दिनेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात झाली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील यांचे छत्र हरपले आहे अशा ३३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व गायकवाड यांनी स्वीकारले. शहरात आत्तापर्यंत कोरोनामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गरीब तसेच हातावर पोट असणारी अनेक कुटुंबे आहेत. त्यातच उद्योगधंदे, रोजगार ठप्प झाल्याने आर्थिक कोंडीत सापडले आहेत. परिणामी अशा अनेक कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये अशा कुटुंबाना मदतीचा हात देणे अत्यंत महत्वाचे ठरत आहे. याच भावनेतून ‘जबाबदारी शैक्षणिक संगोपनाची, साथ उज्वल भविष्याची’ उपक्रमांतर्गत निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले असल्याचे मनोगत गायकवाड यांनी व्यक्त केले. आमदार महेश लांडगे यांनी या सामाजिक तसेच सध्यपरिस्थितीची गरज ओळखून राबवलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचेनियोजन नवजीवन स्पोर्टस् फाउंडेशन यांनी केले व उदय गायकवाड यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अश्विनी जाधव यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments