Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांना 'डीबीडी'तून साहित्य खरेदीकरिता मिळणार 'क्यूआर कोड'..

विद्यार्थ्यांना ‘डीबीडी’तून साहित्य खरेदीकरिता मिळणार ‘क्यूआर कोड’..

प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्य पुरविण्यासाठी पालिकेचा पुढाकार; नव्या प्रणालीमधून पारदर्शकता वाढणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा देण्यासाठी शिक्षण विभागाकडून सदैव नवनवे उपक्रम राबविण्यात येतात. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व त्याबरोबरच शैक्षणिक सोयींसोबतच दर्जेदार शालेय साहित्य पुरविण्यासाठीही विभागाकडून कायम पुढाकार घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे शालेय साहित्य पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी आता क्यूआर कोड प्रदान करण्यात येणार आहेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक आपल्या झोनमधील नेमण्यात आलेल्या पुरवठादार ठेकेदारांकडून शालेय साहित्य खरेदी स्वीकारू शकणार आहेत.

महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ४२ हजार, माध्यमिक शाळांमध्ये ९ हजार, अशा पहिली ते दहावी एकूण ५१ हजार विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायमाला, कार्यानुभव, पीटी बूट, मोजे, दप्तर, वह्या, पाण्याची बॉटल, रेनकोट, चित्रकला पुस्तक, नकाशावही, कंपास पेटी, पट्टी आदी प्रकारचे साहित्य ‘डीबीटी’द्वारे मिळणार आहे.

शालेय साहित्यासाठी पालिकेचे आठ झोनमध्ये आठ पुरवठादार ठेकेदार

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यासाठी एकसमान पद्धती उपलब्ध व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने शहरातील आठ झोनमध्ये आठ पुरवठादार ठेकेदार नेमले आहेत. त्यांच्याकडून त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यात येणार आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावावर तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे शालेय साहित्य खरेदी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये नेमण्यात आलेले पुरवठादार ठेकेदार आपल्या झोनमधील प्रत्येक शाळेमध्ये शालेय साहित्य पुरविण्यासाठी कॅम्प आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थी व पालकांना शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार साहित्य

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपनीचे साहित्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना साहित्य मिळण्यासाठी एक विशिष्ट पद्धती असावी असा शाळा व्यवस्थापन समिती व महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा आग्रह होता. त्यांच्या अभिप्राय लक्षात घेऊन विभागाने विद्यार्थ्यांना क्यू आर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्याची यादी संबंधित पुरवठादार ठेकेदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला एकसमान दर्जेदार साहित्य मिळणार आहे. मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जा असणारे साहित्य मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

‘क्यूआर कोड’ पद्धतीचे हे आहेत फायदे

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी एकसमान पद्धतीचा होणार अवलंब

विद्यार्थी व पालकांना साहित्य खरेदी करण्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध केल्याने खरेदी केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळणार

क्यूआर कोड पद्धतीमुळे शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना एकसमान साहित्य मिळणार

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून शालेय साहित्य दिले जाते. विद्यार्थी व पालकांना शालेय साहित्य मिळण्यासाठी महापालिकेने पुरवठादार ठेकेदारांची नेमणूक केली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी आम्ही नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा क्यूआर कोड तयार करण्यात आला असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे. पुरवठादार ठेकेदारांकडून क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित विद्यार्थ्याला साहित्य दिले गेल्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने शहरातील आठ झोनमध्ये आठ पुरवठादार ठेकेदारांची नेमणूक केली आहे. पुरवठादारांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य देण्यासाठी महापालिकेने दराची निश्चिती केली असून, दर्जेदार कंपनीचे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थांना शालेय साहित्य उपलब्ध केले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लागणार आहे. महापालिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव तत्पर आहे. प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून दर्जेदार साहित्य देण्यासाठी कटिबद्ध…

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. ‘डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळण्यासाठी विभागाद्वारे आता विद्यार्थी व पालकांना क्यूआर कोड देण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दिलेल्या अभिप्राय यातून सबंधित निर्णय विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी पालकांना देण्यात आलेल्या क्यू आर कोड द्वारे त्यांना साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. पालिकेने नेमलेल्या पुरवठादार ठेकेदारांना दर निश्चित करून विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपन्यांचे साहित्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments