Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीनिवडणूक कामकाजासाठी सुमारे १२ हजार जणांची नियुक्ती

निवडणूक कामकाजासाठी सुमारे १२ हजार जणांची नियुक्ती

आज सुमारे ३ हजार ५७३ अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक प्रशिक्षण

निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करण्यात येणार कारवाई

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृह व आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे एकूण ४ हजार ७६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश निर्गमित झाले होते त्यापैकी सुमारे ३ हजार ५७३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती मनुष्यबळ कक्षाचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली. 

महापालिका निवडणूकीच्या कामकाजासाठी उद्या २१ डिसेंबर रोजी देखील एकूण ४ हजार ७६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात सकाळी ९ वाजलेपासून निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज निवडणूकीचे प्रशिक्षण घेतले नाही किंवा प्रशिक्षणास अनुपस्थित होते त्यांनी उद्या रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रशिक्षणास हजर राहून प्रशिक्षण पुर्ण करावे, असे आवाहन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे. तसेच जे अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील त्यांच्यावर लोक प्रतिनिधित्व अधिनियम कलम १४ (२) (३) (४) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त लोणकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments