Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवडमधील तरुणीने विटेवर ‘विठ्ठला’चं हुबेहूब रूप साकारलं

पिंपरी चिंचवडमधील तरुणीने विटेवर ‘विठ्ठला’चं हुबेहूब रूप साकारलं

पिंपरी- चिंचवडमधील तरुणीने विटेवर ‘विठ्ठला’चं हुबेहूब रूप साकारलं आहे. सध्या आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागलेली आहे. विठ्ठलाच्या एका छबीसाठी वारकरी आसुसल्याचं पहायला मिळते आहे. हेच आषाढी वारीचं औचित्य साधून तरुणीने विटेवर सावळ्या विठ्ठलाचं रूप रेखाटलं आहे. अनुजा चैतन्य जोशी अस या तरुणीचे नाव आहे. चार ते पाच तास विठूचं रूप साकारण्यासाठी लागल्याचे अनुजाने सांगितलं.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसलेला आहे. दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. याच आषाढी वारीचे निमित्त साधून अनुजाने विटेवर ‘विठ्ठल’ साकारला आहे. विठ्ठलाचं रूप रेखाटण्यासाठी अनुजाला चार ते पाच तास लागले. साक्षात माझ्यासमोर ‘विठ्ठल’ उभे असल्याचे समजून विटेवर विठ्ठल साकारला आहे. असं अनुजा हिने सांगितलं आहे.

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या अनुजाने पिंपळाच्या पानावर तुकोबांचे रूप साकारले होते. तर सुपारीवर श्रीगणेश साकारले होते. अत्यंत आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारी पेंटिंग बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. गेली अनेक वर्षे झाली ती असे चित्र रेखाटते आहे. जगद्गुरू तुकोबा आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आषाढीनिमित्त या दोन दिवसांमध्ये दाखल होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments