सूरज व त्याचे तीन मित्र रात्री चिखली येथील बैलगाडा मैदानावर गेले होते. लोखंडी पट्टीने व धारदार शास्त्राने त्याच्या डोक्यावर व शरीरावर वार करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर त्याचे मित्र पळून गेले. त्यांच्यामधील वादामुळे सूरजवर खूनी हल्ला करण्यात आल्याचा पोलीसांना संशय आहे. यामध्ये सूरज उर्फ सोन्या संदीप शिंदे (वय 22, रा. यशवंतनगर, पिंपरी) याचा मृत्यू झाला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी ही माहिती दिली.
या हल्ल्याची माहिती एका नागरिकाने जवळच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना रात्री 8.30 ते 8.45 वा चे दरम्यान दिली. त्यामुळे लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी शिंदेला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार तसेच डीबी टिम घटनास्थळावर असून तपास चालू आहे. खुनाचे नेमके कारण अजून कळाले नाही. पोलीस त्या तरुणाच्या मित्रांचा शोध घेत आहे.