Monday, July 15, 2024
Homeअर्थविश्वजंगली रमीत पैसे हरल्याने तळेगाव दाभाडे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

जंगली रमीत पैसे हरल्याने तळेगाव दाभाडे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

पुण्याजवळील तळेगाव दाभाडे मध्ये ऑनलाइन जंगली रमीमध्ये वीस हजार रुपये हरल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश सोमनाथ काळदंते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गणेश हा कॅब चालक होता. तो स्वतःची गाडी चालवायचा. परंतु, या व्यतिरिक्त त्याला जंगली रमी खेळण्याचं व्यसन होतं. अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे.

कमी वेळेत जास्त पैसा कमवायच्या नादात अनेक जण ऑनलाईन गेमला बळी पडतात. मोबाईलमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक ऑनलाईन गेमचे अमिष दाखवले जाते. अशाच जंगली रमी खेळणाऱ्या गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश कॅब चालवून संसार चालवायचा, त्याला याव्यतिरिक्त जंगली रमीबरोबरच मद्यपान करण्याचं व्यसन होतं अशी माहिती तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.

रविवारी गणेशने घरात सर्वजण असताना स्वतःच्या बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री गणेश बाहेर का येत नाही म्हणून दरवाजा ठोठावला. पण, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडला तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उजेडात आलं. गणेश हा सतत मोबाईलमध्ये असायचा अशी माहिती समोर येते आहे. ऑनलाइन जंगली रमीमध्ये वीस हजार हरल्याने त्याने गळफास घेतल्याचं तळेगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments