Friday, April 12, 2024
Homeआरोग्यविषयकपुणे महानगरपालिकेचे मास्कसक्तीबाबत अत्यंत महत्त्वाचं पाऊल

पुणे महानगरपालिकेचे मास्कसक्तीबाबत अत्यंत महत्त्वाचं पाऊल

२३ जानेवारी २०२१,
महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. तेव्हापासून करोनाच्या विळख्यात सापडलेलं पुणे शहर अजूनही या साथीतून पूर्णपणे सावरलेलं नाही. मात्र, नेहमीच निर्णयांच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहणाऱ्या पुण्याने आज मास्कसक्ती बाबत खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे.

पुणे पालिकेने मास्कसक्तीबाबत अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. शहरात एखादं कुटुंबं त्यांच्या स्वत:च्या कारमधून फिरत असेल तर त्यांना आता मास्कची सक्ती असणार नाही, असे महापौर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. मास्कसक्तीतून दिली जाणारी ही सवलत मर्यादित असेल. प्रवासी वाहतूक करणारी वाहने (ओला, उबर कॅब) तसेच दुचाकीवरून तुम्ही जात असाल तर मात्र तुम्हाला मास्क वापरणं बंधनकारक असेल, असेही मोहोळ यांनी पुढे स्पष्ट केले.
दरम्यान, करोना साथ आल्यापासून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर मास्क आलेला आहे. आता करोनाचा जोर ओसरत असताना पुण्यात मास्कसक्तीतून मर्यादित स्वरूपात सवलत दिली गेल्याने या निर्णयाची बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. याची कशाप्रकारे अंमलबजावणी होणार, पुणे पालिका त्यावर कशाप्रकारे लक्ष ठेवणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments