Friday, June 13, 2025
Homeआरोग्यविषयककोविड टास्क फोर्स प्रमुखांचे संपूर्ण लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान…

कोविड टास्क फोर्स प्रमुखांचे संपूर्ण लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान…

ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर भारतात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३३ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात प्रमुख महानगरांमध्ये करोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र असून ही करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचे सोमवारीच कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी आज लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.

देशात करोनाची तिसरी लाट धडकल्याने लॉकडाऊन लावले जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांनंतर दिल्लीतही आज मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाढीचा वेग पाहता पुढील काही दिवसांत देशातील अन्य राज्येही अशाप्रकारची पावले उचलतील असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे का, असे विचारले असता कोविड टास्क फोर्स प्रमुखांनी त्यावर अगदी स्पष्ट उत्तर दिले. लॉकडाऊन लावण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी अत्यंत सुनियोजित पद्धतीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच ‘स्मार्ट कंटेनमेंट ‘ केल्यास स्थिती नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होईल, असे एन. के. अरोरा यांनी सांगितले. त्याचवेळी जिल्हा स्तरावर काही प्रमाणात निर्बंध लावता येतील, असे ते म्हणाले.

करोनाची तिसरी लाट भारतात सुरू झाली आहे. गेल्या एका आठवड्यात करोना बाधितांची संख्या तीन पटीने वाढली आहे. त्यात ओमिक्रॉन हे प्रमुख कारण ठरले आहे. ही रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदू कधी गाठेल आणि रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा खाली कधी घसरेल हे आताच सांगता येणार नाही. पण येत्या काही दिवसांत आणखी वेगाने रुग्णांची संख्या वाढेल, असे अरोरा यांनी नमूद केले. रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. डेल्टाबाबत जी स्थिती होती ती आज नाही. लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळत आहेत. कोविड वॉर्डातील ९० ते ९५ टक्के बेड्स आजही रिकामे आहेत. सध्या जे रुग्ण दाखल होत आहेत त्यातील बहुतेक सहव्याधीग्रस्त आहेत, अशी माहिती अरोरा यांनी दिली. सध्या ज्या लस उपलब्ध आहेत त्या ओमिक्रॉनला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. अगदी बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण होत आहे. तरीही लसीकरण झालेले असल्यास जीवाचा धोका मात्र टळत आहे. रुग्णालयात न जाताही रुग्ण बरे होत आहेत, असे सांगताना खास ओमिक्रॉन व्हेरिएंटवरील औषधाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशातही यावर काम सुरू आहे, असे अरोरा यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments