पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक १० मधील संभाजीनगर परिसरात एका टेम्पोवर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पोचे नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाची फांदी आणि खोड हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
सततच्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडांच्या परिसरात वाहन उभी करताना आणि वावरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले


