Tuesday, December 5, 2023
Homeगुन्हेगारी‘मेरी मिट्टी, मेरा देश’ची शपथ घेण्यासाठी जाताना अपघातात वाहतूक पोलीस हवालदाराचा मृत्यू

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ची शपथ घेण्यासाठी जाताना अपघातात वाहतूक पोलीस हवालदाराचा मृत्यू

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाअंतर्गत शपथ घेण्यासाठी जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास चाकण येथे घडली.

योगेश गणपत ढवळे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण वाहतूक विभागात ढवळे हे कार्यरत होते. त्यांना चाकण येथील माणिक चौकात सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत नेमण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान ९ ते १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात राबविले जात आहे.

या अभियानाअंतर्गत शपथ घेण्याकरिता ढवळे हे दुचाकीवरून चाकण वाहतूक विभागाकडे जात होते. एच.पी.पेट्रोल पंपासमोरून जात असताना मोटारीवरील चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ढवळे यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments