मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 22 एप्रिल रोजी विहित वेळेत 3 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यामध्ये प्रशांत रामकृष्ण भगत (उरण, भारतीय जवान किसान पार्टी), श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव, शिवसेना) आणि इंद्रजीत डी. गोंड (खोपोली, अपक्ष) यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण 17 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 33नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज दाखल झालेल्या 3 उमेदवारी अर्जांमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या 4 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत एकुण 66 व्यक्तींनी 125 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :-
चिमाजी धोंडीबा शिंदे (पनवेल, अपक्ष), सुमित रमेश निकाळजे (ताथवडे, अपक्ष), निलेश चंद्रकांत डोके (चिंचवड, अपक्ष), तुकाराम जनार्दन कोळी(उरण, अपक्ष) उषा संजोग वाघेरे पाटील (पिंपरी, शिवसेना उ.बा.ठा), संजोग भिकू वाघेरे पाटील (पिंपरी, शिवसेना उ.बा.ठा), देविदास गणपत लोंढे (चिंचवडगाव, अपक्ष), इकबाल इब्राहीम नावडेकर (रायगड, अपक्ष), नविन अमृत देशमुख (रायगड, अपक्ष), संतोष मगरद्वाज उबाळे (पिंपरी,अपक्ष), अमोल अशोक जमदाडे (चिंचवड, अपक्ष), भारत भाऊसाहेब मिठपगारे (पिंपरी, अपक्ष),प्रफुल्ल पंडीत भोसले (पनवेल, अपक्ष), राजाराम नारायण पाटील (रायगड, बहुजन समाज पार्टी), राकेश नारायण पाटील (रायगड, अपक्ष), माधवी नरेश जोशी (रायगड, वंचित बहुजन आघाडी), डॉ.वसंत उत्तम राठोड (पनवेल, डिजीटल ऑर्गेनायझेशन ऑफ नेशन)