पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये राहत होती, ती मुळची उत्तराखंडमधील नैनीताल येथील असून आत्महत्येचं कारण समजू शकले नाही, पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील एफटीआय संस्थेत शिक्षण घेणारी 28 वर्षाच्या विद्यार्थिनीचा एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये मृतदेह मिळाला असून तिचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे.पुणे पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास चालू केला आहे. विद्यार्थिनीची माहिती घेतली जात असून या घटनेची माहिती विद्यार्थिनीच्या घरी देण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेत (एफटीआय) मध्ये शिक्षण घेत होती. ही मुळची उत्तराखंडमधील नैनीतालमधील असून संस्थेच्याच हॉस्टेलमध्येच ती राहत होती.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
तिच्याच खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली असली तरी अजून पर्यंत तरी आत्महत्येचं कारण अजून समजू शकलं नाही. पुणे पोलिसांकडून पुढील तपास चालू असल्याचे सांगितले जात असून आत्महत्येबाबत काही सुसाईड नोट आहे का त्याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मित्र-मैत्रीणींची चौकशी
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या जवळच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली असून त्यासंबंधात काही गोष्टींचा उलघडा होता का त्याचाही तपास पोलिसांकडून चालू आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्याचेही सांगण्यात येत आहे. 5 ऑगस्ट रोजीही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, त्यानंतर महिनाभरात ही दुसरी आत्महत्या झाली असल्याने एफटीआयमध्ये खळबळ माजली आहे.