Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीशालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या एसटी बसला भीषण अपघात; १३ विद्यार्थी जखमी

शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या एसटी बसला भीषण अपघात; १३ विद्यार्थी जखमी

२५ डिसेंबर
शाळेच्या सहलीची बस उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसून अपघात झाल्याची घटना पुणे-मुंबई महामार्गावर घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं ऊसाची ट्रॉली महामार्गावर उलटली. उर्से तळेगाव खिंडीत संगमनेर (अहमदनगर) येथील बी. जे. खताळ हायस्कूलची ही बस होती. बसमध्ये ४५ विद्यार्थी होते यापैकी १५ विद्यार्थी तर तीन शिक्षक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. आज पहाटे झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व जखमी प्रवाशांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या मार्गावरील खिंडीत पहाटे चारच्या सुमारास हि घटना घडली.

इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची ही सहल होती. बसमध्ये एकूण ४४ ते ४५ विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांच्या सहलीचा हा शेवटचा दिवस असून पहाटे अपघात झाल्यानं विद्यार्थी गाढ झोपेत होते. अपघातानंतर एसटी बस महामार्गावर बंद झाल्यानं आणि उसाच्या मोळ्या महामार्गावर पडल्यानं मुंबईवरून पुण्याकडं जाणारा मार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता. पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडं जाणाऱ्या एक मार्गावरून विरूद्ध दिशेनं धोकादायक पद्धतीनं गाड्या पुण्याकडं वळवण्यात आल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments