Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रवाघोलीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली, अनेक विद्यार्थी जखमी

वाघोलीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली, अनेक विद्यार्थी जखमी

पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होतंय. या बसच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जखमी मुलांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या बसचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ही बस रस्ता सोडून थेट बाजूला असल्याच्या झाडावर आदळली असल्याचं त्यातून दिसतंय. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीत रायझिंग स्टार नावाची शाळा आहे. या शाळेसाठी विद्यार्थी हे बसमधून निघाले होते. त्या बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

ड्रायव्हरची चूक, मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघातासाठी बसचा ड्रायव्हर जबाबदार असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आरटीओने या बस ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments