Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू

पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. बाबुराव राठोड असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते ५० वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बाबुराव राठोड हे गेल्या काही वर्षांपासून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असताना अस्वस्थ वाटल्याने घरी पाठवण्यात आलं, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज (बुधवार) सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

राठोड यांना याआधीदेखील ब्रेन हमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ते रात्री ऑन ड्युटी असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस म्हटलं की अधिक ताण येतो. यातून अनेकदा अवेळी जेवण, अवेळी झोपणे अशा गोष्टी घडतात. त्याचा थेट परिणाम पोलिसांच्या प्रकृतीवर होत आहे. असं वारंवार समोर आलेलं आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments