Tuesday, September 10, 2024
Homeगुन्हेगारीपोलीस कर्मचाऱ्याचे अपघातात निधन ; अवयवदान करून समाजसेवा

पोलीस कर्मचाऱ्याचे अपघातात निधन ; अवयवदान करून समाजसेवा

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार राजेश कौशल्य यांचे निधन झाले. सेवेत असताना राजेश कौशल्य यांनी मोठी कामगिरी केली होती. पण त्यांची एक कामगिरी जगासमोर येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजेश कौशल्य यांचा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे अपघात झाला होता. त्यांचा हा अपघात 2 ऑगस्ट रोजी झाला. त्यांनतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. राजेश कौशल्य हे 2009 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केले. 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीला ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत उत्तमप्रकारे काम केले.

घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ते दुचाकीवरून घरी जात होते. मोशी येथे त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र, अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. रात्री अपघात झाल्याने मदत मिळण्यास उशीर झाला. पण नंतर उपचार करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अवयवदान करून समाजसेवा

समाजसेवेची जाण असलेल्या राजेश यांनी त्यांचे अवयवदान करण्याचा अर्ज भरला होता. त्यानुसार, अवयवदान केले जाणार आहे. या अवयवदानाला कुटुंबीयांनीही संमती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments