Wednesday, February 11, 2026
Homeताजी बातमीमहापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने नियोजन...

महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने प्राप्त सूचनांवर संबंधित विभागांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व अधिक नियोजनबद्ध, प्रभावी व नागरिकांच्या व्यापक सहभागातून राबविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन सकारात्मक असून, आवश्यक त्या सर्व सुविधा व समन्वय उपलब्ध करून दिला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने शहरातील विविध शिवजयंती उत्सव समिती तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी समवेत महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक आज पालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती,या बैठकीत अतिरिक्त आयुक्त  विक्रांत बगाडे बोलत होते. 

या बैठकीस सह शहर अभियंता मनोज सेटिया, उप आयुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे,वैशाली ननावरे, शिवाजी चौरे,गणेश राऊत, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,उप अभियंता दमयंती पवार, कार्यालय अधिक्षक राजू कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव, जीवन बोराडे, सागर तापकीर, प्रकाश जाधव, ॲड. लक्ष्मण रानवडे, सतीश काळे, समीर  जावळकर, वसंतराव पाटील, बाळा दानवले, कुणाल कांबळे, सतीश डांगे, प्रल्हाद कांबळे, अश्विनी पाटील, माणिक शिंदे, स्मिता म्हसकर, दिलीपराव गावडे, नवनाथ म्हस्के, मारुती लोखंडे,सुरेंद्र पासलकर, तात्याबा माने, कौशल्या जाधव, प्रविण पायाळ, संतोष म्हस्के,गणेश मासाळ,विशाल बोंगाळे, अपर्णा देशमुख, योगेश बाथम,मयुर गायकवाड, अजय पाताडे, नरेंद्र बनसोडे,आबासाहेब ढवळे,ॲड.अनिल पवार,सचिन बोऱ्हाडे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 

बैठकीदरम्यान उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व अधिक व्यापकपणे राबविण्याच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. महापालिका शाळांमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, तसेच त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन करावे,अशी मागणी करण्यात आली.

प्रबोधन पर्वाचे नियोजनात अधिक सुसूत्रता होण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी ऐवजी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियोजन बैठक घेण्यात यावी,अशी सूचना उपस्थितांनी मांडली. शालेय विद्यार्थ्यांसोबतच खुल्या प्रवर्गासाठी पोवाडे, निबंध, वकृत्व स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, तसेच पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथेही कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना बैठकीत केल्या. 

भक्ती-शक्ती येथील समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, समूहशिल्पाची डागडुजी करून परिसराची स्वच्छता करावी, तसेच शिल्पाच्या मागील बाजूस इमारती, हॉटेल्स अथवा फलक दिसू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. भक्ती-शक्ती चौक येथील उड्डाणपुलास कार्यक्रमाच्या एक आठवडाभर आधी विद्युत रोषणाई करावी आणि एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नागरिकांना दाखवावा,असेही सुचविण्यात आले.

महानाट्य व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी स्वच्छतागृह,पार्किंग व सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, गतवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी व कुलरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच विविध शहरांतून ज्योत घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींचा यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा. कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नियोजन करावे, दरवर्षीप्रमाणे शिवजयंती पूर्वी शहरातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पांची स्वच्छता करण्याबाबतही सूचनाही यावेळी करण्यात आल्या. 

बैठकीचे प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments