Sunday, July 20, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यातील अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोन तरुणांना जागीच केले...

पुण्यातील अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोन तरुणांना जागीच केले ठार

पुण्यात कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका अलिशान कारने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाल्याचं समजतं. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा ती अलिशान कार चालवत असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे. वेदांत अगरवाल (रा. ब्रम्हा सनसिटी) याने Porsche कारने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. शहरातील काही पब्स रात्री उशिरापर्यंत सुरु होते. कल्याणीनगर मधील Ballr पब मधून हे तरुण तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले होते. तेव्हा रात्री उशिरा ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला

चारचाकी पोर्शे चालवणारा तरुण हा अल्पवयीन मुलगा होता, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर अनिस अहुदिया, अश्विनी कोस्टा असं मृत्यू झालेल्या तरुण तरुणीची नावं आहेत. घटनास्थळी रात्री उशिरा पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली.

पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पब, हुक्का बार आणि अव्यदय धंद्यावर कडक निर्बंध घातले आहेत. तरी देखील काही काही पब रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतात. मद्यपान करून आल्यानंतर तरुण-तरुणी शुद्धीत नसल्यावर गाडी वेगाने चालवतात आणि अपघात घडतात. असच अपघात काल रात्री घडला.मृत तरूण-तरुणी अपघातानंतर रस्त्यावरच पडून असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments