Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रअतिक्रमण कारवाईतील जप्त केलेल्या लिफ्ट मशिन लांबवल्या प्रकरणी महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता निलंबित

अतिक्रमण कारवाईतील जप्त केलेल्या लिफ्ट मशिन लांबवल्या प्रकरणी महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता निलंबित

अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

संतोष शिरसाठ असे निलंबित केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. शिरसाठ हे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अतिक्रमण पथकप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. चिखली, मोशीतील अनधिकृत कच्ची, पक्की घरे, पत्राशेड, हातगाड्या, टपऱ्या, पथारीवाले, फळविक्रेत्यांवरील कारवाईसाठी त्यांची नेमणूक होती. शिरसाठ यांनी भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर बऱ्याच वर्षांपासून बेवारसपणे लावलेल्या आणि बंद अवस्थेत असलेल्या पाच लिफ्ट मशिनवर २५ मार्च २०२३ रोजी अतिक्रमण कारवाई केली.

हस्तगत केलेल्या मशिन मोशीतील वाहनतळाच्या ठिकाणी जमा करणे आवश्यक असताना जवळपास पाच महिने विलंबाने म्हणजे २७ ऑगस्ट रोजी तक्रारीनंतर अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथे जमा केल्या. शिरसाठ यांनी कारवाई करताना नियमित सूचनांचे पालन केले नाही. मशिन जाणीवपूर्वक ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात ठेवल्या. याबाबत त्यांनी केलेला खुलासा सयुक्तिक नाही. त्यांच्या गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. ते प्रत्यक्ष सेवेत राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. पुराव्यात फेरफार होऊ नये यासाठी शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments