Monday, May 12, 2025
Homeउद्योगजगतपिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

७ जून २०२१,
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, २० कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.

आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले आहेत. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.

याबात अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते,या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments