अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने 2 ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. फांऊडेशनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान आयोजित केले आहे.
खंडोबा देवस्थान सांस्कृतिक हॉल, आकुर्डी चौक याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या रक्तदान शिबीरात सहभागी होता येईल. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे तसेच डेंगू आणि इतर आजारामुळे मुळे रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अस्तित्व फांऊडेशन मागील सहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यामध्ये वारकऱ्यांसाठी औषध वाटप, आरोग्य तपासणी, कोरोना काळात बारा हजार अन्नधान्य किट वाटप, केरळ पूरग्रस्तांना मदत, प्लाझ्मा दान, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, गड संवर्धन उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांना नेतृत्व कौशल्य शिकवणे, महिलांचा गुणगौरव, चिपळूण- महाड पूरग्रस्तांना मदत, शतावरी आणि बेबी किट वाटप असे अनेक उपक्रम अस्तित्व फांऊडेशनच्या वतीने राबविले जातात.