Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये भव्य रक्तदान शिबिर

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये भव्य रक्तदान शिबिर

पिंपरी चिंचवड शहरांमध्ये प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे,आंबेडकर चौक,पिंपरी या ठिकाणी शिवसेना शहरप्रमुख अॅड. श्री सचिनभाऊ भोसले यांच्या नेतृत्वामध्ये भव्य पद्धतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मा. विनायकजी राऊत (खासदार, प्रवक्ते), मा. सचिन भाऊ अहिर (मा.मंत्री, संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), मा. रवींद्रजी मेर्लेकर (उपनेते), मा. आमदार गौतमजी चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख), सौ. लतिकाताई पाष्टे (महिला संपर्क पमुख), सौ. सुलभाताई उबाळे (जिल्हा संघटिक), सौ. शैलाताई खंडागळे (जिल्हा संघटिका), श्री केसरीनाथ पाटील (भोसरी व पिंपरी संपर्कप्रमुख), श्री दिलीपजी घोडेकर (चिंचवड संपर्कप्रमुख), श्री अशोकजी वाळके (पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी), योगेशजी बाबर (मा. शहर प्रमुख), श्री सचिन सानप (युवा जिल्हाप्रमुख).श्री संजय दुर्गुळे (मा. नगरसेवक), श्रीराम पात्रे (मा. नगरसेवक), रेखाताई दर्शिले (मा. नगरसेविका), रवी खिल्लारे (मा. नगरसेवक), महादेव गव्हाणे (मा. नगरसेवक), हे उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या नियोजन समितीचे काम

श्री संतोष वाळके (पिंपरी चिंचवड संघटक), श्री कैलासजी नेवासकर( शहर समन्वयक), श्री रोमी संधू (उपजिल्हाप्रमुख), श्री हाजीभाई दस्तगीर मणियार (उपजिल्हाप्रमुख), श्री निलेश मुटके (उपजिल्हाप्रमुख) , सौ अनिताताई तुतारे (शहर संघटिका), श्री अनंत कोऱ्हाळे (चिंचवड विधानसभा प्रमुख), श्री धनंजय आल्हाट(भोसरी विधानसभा प्रमुख), श्री तुषार नवले, (पिंपरी विधानसभा प्रमुख), श्री संतोष सौंदणकर (चिंचवड विधानसभा संघटक), श्री युवराज कोकाटे (शहर संघटक), श्री. सुधाकर नलावडे (उपशहर प्रमुख), श्री. श्रीमंत गिरी (उपशहर प्रमुख), श्री हरेश नखाते (उपशहर प्रमुख), श्री संतोष पवार (उपशहर प्रमुख), श्री नवनाथ तरस (उपशहर प्रमुख), श्री. अमोल निकम (उपशहर प्रमुख), श्री. पांडुरंग पाटील (उपशहर प्रमुख), श्री तुषार सहाणे (शहर संघटक), श्री नितीन दर्शले (विभाग प्रमुख), श्री संदीप भालके (विभाग प्रमुख), श्री दादा नरळे (विभाग प्रमुख), श्री गोरख नवघणे (विभाग प्रमुख), श्री गणेश आहेर, श्रीकांत चौधरी (विभाग प्रमुख), श्री. कृष्णा वाळके (विभाग प्रमुख) यांनी केले.

तसेच महिला पदाधिकारी प्रतीक्षाताई घुले, मंगलाताई भोकरे (उपशहर प्रमुख), वैशालीताई कुलथे (उपशहर प्रमुख), रजनीताई वाघ (उपशहर प्रमुख), वैशालीताई घोडके, सुजाताताई नखाते, ज्योतीताई भालके, कामिनीताई मिश्रा, सुजाताताई काटे, गीताताई कुसाळकर, शिल्पाताई आनपन, कमलताई गोडांबे, कलावतीताई नाटेकर, ज्योतीताई गायकवाड, सुनिताताई सोनावणे, हर्षालीताई घरटे यांनीदेखील नियोजनामध्ये व स्वगातोस्तुक म्हणून काम पाहिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड-भोसरी शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमास सहभाग घेवून स्वतः रक्तदान केले. मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक, बंधू-भगिनींनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून रक्तदान केले. 1123 रक्तदात्यांनी सहभाग घेवून या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले.

मा. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.मा. विनायकजी राऊत (खासदार), श्री. मा. सचिनभाऊ आहिर, मा. श्री. रविंद्रजी मेर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भव्य प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी तसेच शहरातील नागरिक, बंधू-भगिनी, युवा या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अॅड. श्री सचिनभाऊ भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments