Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रपिंपरी- चिंचवड औद्योगिक भागातील बंद कंपनी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २४ लाखांचं तांब...

पिंपरी- चिंचवड औद्योगिक भागातील बंद कंपनी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २४ लाखांचं तांब जप्त

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. शहरातील भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. या परिसरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.

या घटनेप्रकरणी अब्दुलकलाम रहिमान शहा, योगेश तानाजी चांदणे, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान आणि शकील मंसूरी अशी अटक आरोपींची नावे असून टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भोसरी एमआयडीसीसह चाकण एमआयडीसीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. याच अनुषंगाने चिखली पोलिसांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केलं. या पथकाने दिघी, म्हाळुंगे आणि चिखली परिसरात कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा सीसीटीव्ही अत्यंत बारकाईने पाहिल आणि एकाच टोळीने ही चोरी केल्याच पुढे आले. यातील आरोपी हे दिवसा एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपनीची रेकी करून रात्री चोरी करायचे. विशेषतः हे आरोपी कंपनीतील महागडा तांब असलेलं मटेरियल चोरायचे. कंपनीच्या बाहेर आणून हे मटेरियल ठेवल्यानंतर ते टेम्पोमध्ये घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विकायचे. यामधून त्यांना लाखो रुपये मिळत असल्याचं पोलीस तपासात समोर आले,

याच दरम्यान तांत्रिक विश्लेषण करून पोलीस अब्दुल कलाम रहिमान शहा याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला, या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. आरोपींकडून २४ लाख ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यासह दिघी, चाकण, कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक, पोलीस कर्मचारी बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विश्वास नानेकर, भास्कर तारळकर, संदीप मासाळ, दीपक मोहिते, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष सपकाळ, संतोष भोर यांच्या टीम ने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments