Thursday, May 15, 2025
Homeअर्थविश्वपिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

क्रेडलवाइजच्या पाळण्याचे अमेरिका व भारतात पेटंट; पाळण्याची विक्री, सेवा आता भारतात सुरू

आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी-आजोबांचा आणि आई-वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही. त्यामुळे लहान बाळांच्या संगोपनात अनेक समस्या उद्भवतात. बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते. परंतु आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. या समस्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, तंत्रज्ञान युक्त, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे म्हणजेच द. क्रेडलवाइज.

या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू लागले की, त्याची सूचना मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे पालकांना मिळते. बाळ रडण्यापूर्वीच पाळणा हळुवारपणे स्वयंचलित सुरक्षित झोके देण्यास सुरुवात करतो. त्याचे सर्व नियंत्रण दूरवरून मोबाईल द्वारे करता येते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय निर्माण होत नाही. यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या पाळण्याची सुरक्षाविषयक सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे या उत्पादनाला सुरक्षाविषयक अमेरिकेतील जेपीएमए (JPMA-Juvenile Product Manufacturing Association) आणि ग्रीनगार्ड (GREENGUARD) हे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

बाळाच्या हालचाली ओळखून हा स्वयंचलित पाळणा बाळावर देखरेख ठेवतो आणि पालकांना मोबाईल ॲप्लीकेशन द्वारे सुचित करतो. हा पाळणा अचूकतेने, अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि पालकांना देखील आपला वेळ वाचवून कामात लक्ष देता येते, तसेच स्वतःची देखील व्यवस्थित झोप घेता येते.

क्रेडलवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे अशी माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक किरण ब्याहटटी यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

   यावेळी क्रेडलवाईजचे उत्पादन व्यवस्थापक माधव आनंद, मनुष्यबळ संसाधन अधिकारी विशाल सातारकर व आशिष बंका, गुणवत्ता व्यवस्थापक ज्ञानेश्वर कोळगे, पुरवठा साखळी प्रमुख अनुप जोशी, वरिष्ठ लॉजिस्टिक प्रबंधक विनित प्रियदर्शी, मयूर मेश्राम, विश्वरंजन सामाल, हरीश आर., वाणी तडकापल्ली आदी उपस्थित होते.

यावेळी किरण ब्याहटटी यांनी सांगितले की, या आत्याधुनिक पाळण्यामुळे बाळांना पूर्ण झोप मिळण्यास व बाळाची व्यवस्थित शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यास मदत होते. तसेच पालकांना देखील त्यांच्या व्यस्त वेळा सांभाळून बाळावर लक्ष ठेवणे सुलभ होते. हा पाळणा बाळ २४ महिन्याचे होईपर्यंत वापरता येईल.

प्रशासन व्यवस्थापक विशाल सातारकर यांनी सांगितले की, क्रेडलवाइज ची स्थापना राधिका पाटील व भरत पाटील या दांपत्याने केली आहे. राधिका या पिंपरी चिंचवड मधील नामांकित सर्जन डॉ. नितीन गांधी यांची कन्या आहेत. राधिका यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी चिंचवड मध्ये तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथील सीओइपी येथे झाले आहे. त्यांचे पती भरत पाटील हे देखील उच्चशिक्षित आहेत. राधिका आणि भरत या दोघांचे उच्च शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूर येथे झाले आहे.

राधिका आणि भरत पाटील यांनी क्रेडलवाइज ची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये त्यांना बाळ झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक उपाय शोधत असताना अनेक वर्ष प्रयत्न करून त्यांना भेडसावलेल्या समस्येतून या बेबी टेक्नॉलॉजी कंपनीच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली आणि द क्रेडलवाइज ची निर्मिती करण्यात यश आले. या कंपनीच्या उत्कृष्ट तंत्रज्ञान कौशल्याच्या कामात इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरच्या माजी विद्यार्थी, अवॉर्ड मेडिकल स्कूल बोर्ड प्रमाणित स्त्री रोग तज्ञ एम. डी. डॉ. चित्रा अकिलेस्वरन, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील नवजात बालरोग तज्ञ एम. डी. डॉ. अनुप राव यांचा समावेश आहे.

   उत्पादन व्यवस्थापक माधव आनंद यांनी सांगितले की, या कंपनीने अमेरिका आणि कॅनडा येथील हजारो कुटुंबांना हे उत्पादन दिले आहे. त्यामुळे अनेक बाळांना २५ दशलक्ष तासांपेक्षा अधिक वेळ छान झोप घेण्यास मदत झाली आहे. आता हा आधुनिक तंत्रज्ञान युक्त पाळणा भारतातील घराघरांमध्ये पोहोचणार आहे. या उत्पादनाला फास्ट कंपनीचे नेक्स्ट बिग थिंग्स इंटेक “स्मार्ट क्रीब” आणि टाईम मॅगझिनचे “बेस्ट इन्वेंशन्स अवॉर्ड” हे पुरस्कार मिळाले आहेत. या पाळण्याचे अमेरिकेत व भारतात पेटंट रजिस्टर झाले आहे. या अत्याधुनिक पाळण्याची अंतिम बांधणी क्रेडलवाइज कंपनी, हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे करण्यात येत आहे.

    विपणन अधिकारी अनुप जोशी यांनी सांगितले की, एक्स आणि चॅट जीपीटीचे संस्थापक, संशोधक सॅम अल्टमॅन यांनी देखील हा पाळणा खरेदी केला आहे. त्यांनी राधिका आणि भरत पाटील यांचे अभिनंदन करणारा व या संशोधनाला शुभेच्छा देणारा संदेश एक्स वर प्रसारित केला आहे. आता हा पाळणा भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी www.cradlewise.comया वेबसाइटवर संपर्क साधावा किंव्हा 

रेलीना डिसिल्वा, फोन ९१ ९९१६ ८९ ७५९८,

relina@cradlewise.com

www.cradlewise.com 

किंव्हा मेघना – फोन – ९१९०३०७१५६८२,

meghana@cradlewise.com

www.cradlewise.com 

यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्रेडलवाइज कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments