वर्ल्ड कप 2023 सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी राहिले असून हा थरार पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते आतूर झालेत. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने बीसीसीआयनेही जंगी तयारी केलीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा पुण्यात वर्ल्ड कपचे सामने आयोजित केले आहेत. तब्बल 27 वर्षांनी पुण्यामध्ये वर्ल्ड कपचे सामने होणार असल्याने पुणेकरही उत्सुक आहेत. याआधी सर्वात पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आज (26 ऑक्टोबर) पुण्यात वर्ल्ड कप ट्रॉफीचं आगमन होणार असून ट्रॉफीची जंगी रॅली काढण्यात येणार आहे.
‘या’ मार्गांवरून निघणार रॅली
वर्ल्ड कप ट्रॉफीची रॅली एस बी रोडवरील मॅरेट या नामांकित हॉटेलपासून ही रॅली सुरू होणार असून बीएमसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज रोड ते ॲग्रीकल्चर कॉलेज शिवाजीनगरपर्यंत असणार आहे. दुपारी एक वाजता रॅली सुरू होणार असून पुणेकर स्टाईलने ढोल ताशाच्या गजरात या ट्रॉफीच स्वागत केलं जाणार आहे. पुण्यात होणाऱ्या या रॅलीमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आजी-माजी खेळाडू सहभागी होणार आहेत.
वर्ल्ड कपच्या मेजवाणीआधी पुणेकरांना आयसीसीची ट्रॉफी जवळून पाहता येणार आहे. इतकंच नाहीतर ट्रॉफीसोबत सेल्फी घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दुपारी एक वाजता या रॅलीला सुरूवात होणार असून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळेत तिथून प्रवास करणार असाल तर दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्था विस्कळित होऊ नये यासाठी सर्व पुणेकरांनी याची दक्षता घ्यावी.
पुण्यामध्ये वर्ल्ड कपचे होणारे सामने
भारत विरुद्ध बांगलादेश (19 ऑक्टोबर), अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (30 ऑक्टोबर), न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (1 नोव्हेंबर ), इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स (8 नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (11 नोव्हेंबर)
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यामध्ये 5 तारखेपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. तर पुण्यामध्ये यंदा वर्ल्ड कप स्पर्धेमधील पहिला सामना 19 ऑक्टोबरला बांगलादेशसोबतचा पहिला सामना आहे.