Sunday, July 14, 2024
Homeमुख्यबातम्यापुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल..

पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल..

आतापर्यंत आपण फसवणुकीच्या अनेक घटना बघितल्या असतील, मात्र, पुण्यात चक्क मटणाची उधारी न देता दुकान मालकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही उधारी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 61 लाखांची उधारी आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल मालकानेच ही फसवणूक केल्याचं देखील समोर आले आहे. हॉटेलसाठी मटन, चाप खिमा असे मटणाचे अनेक प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे दिले नसल्याने मटन विक्रेत्याने हा गुन्हा दाखल केला आहे. फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला असून, ते पुण्यातील प्रसिद्ध बागबान हॉटेलचे मालक आहेत.

मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या प्रसिद्ध बागबान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 35 वर्षे पीडित फिर्यादी यांचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचे दुकान आहे. त्यांच्या मटणाच्या दुकानांमधून बागवान बंधूंनी 61 लाखांचे मटन,चाप, खिमा आणि गुर्दा अशा मटणाचे वेगवेगळे प्रकार घेतल्यावर त्याचे पैसेच दिले नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ…
पुण्यात अनेक प्रसिद्ध व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहेत. विशेष म्हणजे नॉनव्हेज जेवणासाठी पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलची विशेष चर्चा असते. त्यामुळे पुणेकर या हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी करतात. त्यापैकी बागबान हॉटेल देखील नेहमी चर्चेत असते. मात्र याच हॉटेलची आता मटणाचे पैसे दिले नसल्याने झालेल्या फसवणूक केल्याप्रकरणी चर्चा होत आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments