Tuesday, December 10, 2024
Homeगुन्हेगारीसरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासह आणखी दोन वकिलांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह शेखर सोनाळकर, उदय पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याता आला आहे.

या प्रकरणी सूरज झंवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये १ कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. यावरुन वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी सारख्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १६६, २१३, ३८४, ३८५, ३८६, ३८८, ५०६, ३४, १२० ब अंतर्गत त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोण आहेत प्रवीण चव्हाण?

प्रवीण चव्हाण हे तेच सरकारी वकील आहेत जे यापूर्वी आपल्या कार्यालयातील एका व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. विरोधीपक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत या व्हिडिओचा एक पेनड्राईव्ह सादर केला होता. तसेच गिरीश महाजन यांची केस देखील याच वकिलांकडे होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments