Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रप्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध...

प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्याननंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे (वय ४९) यांनी याबबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबिर शिर्डीत नुकतेच पार पडले. या शिबिरात आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रभू श्रीराम वनवासात मांसाहार करत असल्याचे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments