Saturday, March 22, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल…

पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणाऱ्या डुप्लिकेट सीएम विजय नंदकुमार मानेवर युनिट दोनच्या पथकाने कारवाई केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर भांदवी कलम ४१९-५११, ४६९, ५००, ५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा आणि पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे.

नुकतीच विजय माने आणि एकनाथ शिंदे यांची भेटही झाली होती. त्यानंतर आता विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत विजय माने यांच्यावरही आरोपांवरुन पोलिसांवर निशाणा साधलाय. विजय नंदकुमार माने हा एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही, असं सरोदे यांनी म्हटलंय.

विजय नंदकुमार माने याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेने कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे लावले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments