Friday, June 13, 2025
Homeउद्योगजगतहिंदुहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग… नेमका कसा आहे याचा थोडक्यात घेतलेला आढावा…

हिंदुहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग… नेमका कसा आहे याचा थोडक्यात घेतलेला आढावा…

विदर्भासाठी खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’चा महामार्ग ठरू शकणारा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे कोणत्या शहरातून जातो याचा थोडक्यात घेतलेला आढावा.

कुठल्याही देशाच्या विकासात रस्ते विकासाचे जाळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे म्हणतात. देशाच्या विकासाचा मानबिंदू हा रस्ते असतो. या रस्त्यांचे जाळे गतिमान असेल तर गतिमान विकासाला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात 11 डिसेंबर रोजी लोकार्पण होत असलेला हिंदुहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भाला पर्यायाने राज्याला अग्रेसर करण्याचे एक माध्यम ठरणार आहे

विदर्भवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे . विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही या महामार्गामुळे वाढणार असून यातून विदर्भाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

थोडक्यात समृद्धी मार्ग

एकूण लांबी:- 701 किमी. ,

रस्त्याची रुंदी :- 120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)

मार्गिका :- 3+3 मार्गिका

वाहन वेग प्रस्तावित :- 150 किमी/तास ( डोंगराळ भागासाठी 120 किमी./तास)

प्रस्तावित इंटरचेंजेंस :- 25

रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या नवनगरांची संख्या:- 18

मोठे पूल :- 32

लहान पूल :- 317

बोगदे :- 7

रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8

व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73

कल्व्हर्ट :- 762

किती जिल्हा, तालुका व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे

वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments