Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमी‘कालनिर्णय २०२३ च्या आवृत्तीमध्ये एक मोठी चूक … त्या’ चुकीसाठी व्यक्त केली...

‘कालनिर्णय २०२३ च्या आवृत्तीमध्ये एक मोठी चूक … त्या’ चुकीसाठी व्यक्त केली दिलगीरी

दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर चर्चा सुरु होती ती पुढील वर्षाच्या कॅलेंडरची. मराठी जनांसाठी तर कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे जणू काही समिकरणच झालं आहे. त्यामुळेच दरवर्षी इयरएण्डला ‘भितींवरी कालनिर्णय असावे’ असं सांगणारी जाहिरात आवर्जून ऐकायला, पहायला मिळते. आता तर कालनिर्णय डिजीटल स्वरुपामध्येही उपलब्ध आहे. मात्र पुढील वर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या कालनिर्णयमध्ये एक मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कालनिर्णय’नेच ही चूक मान्य केली असून ट्वीटरवरुन यासंदर्भातील माफी मागितली आहे.

कालनिर्णयच्या ट्वीटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील खुलासा करण्यात आला आहे. ही चूक छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्तची असल्याचं कालनिर्णयने म्हटलं आहे. तसेच अशी चूक यापुढील अवृत्त्यांमध्ये होणार नाही असंही कालनिर्णयने संभाजी महाराजप्रेमींना सांगितलं आहे. यासंदर्भातील एक छोटं निवेदनच ट्वीटरवरुन शेअर करण्यात आळं आहे.

“कालनिर्णय २०२३ च्या आवृत्तीमध्ये १६ जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. यापुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच यापुढील सर्व आवृत्तांमध्ये हा उल्लेख केला जाईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत,” असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

कालनिर्णय कंपनीची स्थापना १ जानेवारी १९७३ रोजी करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या मात्र कालनिर्णय आणि मराठी माणूस असं एक अतूट नातं तयार झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments