पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी काल रात्री आग लागल्याची घटना घडली . या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.
वाकड येथील भुजबळ चौकाजवळील एका गादीच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळाले झाले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील पसरली होती. त्यामुळे तीन दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी, रहाटणी उपकेंद्र, हिंजवडी, पीएमआरडीए येथील पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. ही नेमकी कशामुळे लागली याचा तपास आता सुरु आहे.