Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीगुजरातच्या अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून ५७ तासांचा नाईट कर्फ्यू .

गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून ५७ तासांचा नाईट कर्फ्यू .

20 November 2020.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोनाव्हायरसच्या झपाट्याने वाढत असलेल्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने आज (२० नोव्हेंबर) रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यू (Night Curfew) लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री ९ वाजल्यापासून कर्फ्यू सुरू होईल आणि सोमवारी सकाळी ६ पर्यंत सुरू राहतील.

यानंतर कोरोना नियंत्रित होईपर्यंत मंगळवारपासून सकाळी ९ ते सकाळी ६ या वेळेत नाईट कर्फ्यू असणार आहे. या निर्णयानंतर आज बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुकानासमोर प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

कर्फ्यूबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि यामुळे अहमदाबादमध्ये सकाळपासूनच दुकानांमध्ये खरेदीसाठी लांबलचक रांगा दिसून आल्या आहेत. लोकांना वाटत आहे की, परिस्थिती नियंत्रित न केल्यास कर्फ्यूमध्ये आणखी वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. कर्फ्यूच्या वेळी केवळ दूध आणि औषधे विकणारी दुकाने खुली राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५७ तासांचा कर्फ्यू सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमधील अहमदाबाद नगरपालिका परिवहन सेवा (AMTS) ने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एएमटीएस बससेवा आज रात्री ९.०० ते सोमवार पर्यंत बंद राहील.

अहमदाबाद महानगरपालिकेने मास्क नसेल त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मास्क नसलेल्यांची तात्काळ कोरोना चाचणी देखील केली जाईल आणि जे लोक पॉझिटिव्ह असतील त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी पालिका कर्मचारी सातत्याने पाळत ठेवतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments