Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीदहावीतील १५ वर्षीय मुलीनं सातव्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं आयुष्य; देहूरोड येथील...

दहावीतील १५ वर्षीय मुलीनं सातव्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं आयुष्य; देहूरोड येथील घटना

पुण्यात तरुणांच्या आत्महत्येच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक्ष क्षेत्रातील आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. मात्र आता थेट दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली आणि यातच या मुलीचा मृत्यू झाला. देहू परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मोबाईल खेळण्यावरुन घरात आई-वडिलांशी वाद झाला होता. आर्याचे आई वडिल मुळचे सांगोल्याचे आहेत. ते दोघेही साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सावंत यांना दोन मुली आहेत. आर्या ही घरातली मोठी मुलगी होती. आर्याने काही कारणासाठी मोबाईल हवा होता मात्र आई वडिलांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला. हे पाहून तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट टोकाचं पाऊल उचललं. ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि थेट सातव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments