पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर या शाळेत जिन्यातील रेलिंगवरून पडून 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी घडली. सार्थक कांबळे (वय 13, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील हुतात्मा चापेकर शाळेत अथर्व हा खेळत होता. शाळेच्या इमारतीमध्ये जिन्याच्या रेलिंगवरून तो घसरगुंडी खेळत होता. खेळत असताना रेलिंगवरून त्याचा तोल गेला आणि तो जिन्याच्या डक्टमध्ये पडला.
गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर पालकांचा शाळेत जमाव जमला. पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.