Friday, November 1, 2024
Homeअर्थविश्ववर्षभरात पुणे विमानतळावरुन ९५ लाख प्रवाशांचे उड्डाण, प्रवासी संख्येत १८ टक्के वाढ

वर्षभरात पुणे विमानतळावरुन ९५ लाख प्रवाशांचे उड्डाण, प्रवासी संख्येत १८ टक्के वाढ

वर्षभरात पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत पुणे विमानतळ आठव्या स्थानावर; तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशात नवव्या स्थानावर आहे. पुण्यातील ही विमान प्रवाशांची वाढ पाहता स्वतंत्र विमानतळ गरजेचाच असल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे.

काही वर्षांत पुणे विमानतळावरील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्याचे विमानतळाचे टर्मिनल कमी पडत असल्याने नुकतेच नवे टर्मिनल बांधण्यात आले आहे. काही दिवसांत नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले केले जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशभरातील सर्व विमानतळावरील प्रवासी वाहतुकीची आकडेवारी जाहीर केली असून, देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांमध्ये (बिझी एअरपोर्ट) लोहगाव आठव्या स्थानावर आहे. पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या मर्यादित असल्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवासीसंख्येत पुण्याची अल्पशी घसरण झाली आहे. तरीही, देशातील पहिल्या १० विमानतळांमध्ये पुण्याचे स्थान कायम आहे.

प्रवासी वाहतूक करणारी पहिली दहा विमानतळ
विमानतळ प्रवासी संख्या (२०२३-२४)
दिल्ली ७ कोटी ३६ लाख
मुंबई ५ कोटी २८ लाख
बेंगळुरू ३ कोटी ७५ लाख
हैदराबाद २ कोटी ५० लाख
चेन्नई २ कोटी १२ लाख
कोलकाता १ कोटी ९७ लाख
अहमदाबाद १ कोटी १६ लाख
कोची १ कोटी ०३ लाख
पुणे ९५ लाख २५ हजार
दाबोळी, गोवा ६८ लाख ७२ हजार

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments