Monday, July 20, 2026
Homeताजी बातमीमंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनचा ८ वा वर्धापन दिन; पुनावळे येथे ५ ते...

मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनचा ८ वा वर्धापन दिन; पुनावळे येथे ५ ते ७ जुलैदरम्यान भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव

पिंपरी-चिंचवड, दि. २ जुलै : मंडप व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना आधुनिक उत्पादने, सेवा आणि व्यावसायिक संधींचे एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा यांच्या वतीने ८ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५, ६ आणि ७ जुलै २०२६ रोजी पुनावळे येथील मथुरा लॉन्स, संत तुकाराम महाराज ब्रिजजवळ आयोजित करण्यात आला आहे.

या तीन दिवसीय प्रदर्शनात मंडप, डेकोरेशन, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट तसेच संबंधित व्यवसायांशी निगडित विविध उत्पादने, अत्याधुनिक साहित्य, उपकरणे आणि सेवांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या नवीन संकल्पना, तंत्रज्ञान आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ व्यावसायिकांना या प्रदर्शनातून मिळणार आहे.

आयोजकांच्या माहितीनुसार, प्रदर्शनात ४५ हून अधिक प्रीमियम स्टॉल्स, २५ हजार चौरस फूटांचे भव्य प्रदर्शन हॉल आणि विविध कंपन्यांच्या विशेष ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.

मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, केटरर्स, इव्हेंट प्रोफेशनल्स तसेच संबंधित व्यवसायातील उद्योजकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यावसायिक संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महोत्सवासाठी पद्मावती जर्मन हॅंगर टेंट हे प्रमुख सहयोगी असून केडी एक्स्पो आणि कोरस्पेसेस सोल्यूशन एलएलपी यांचेही सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९२२८ ७९४८१ किंवा ९५६१५ ७२७३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments