पुणे जिल्ह्यातील घाट भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लोणावळा धरण क्षमतेच्या 86 टक्के भरले असून, अधिकारी लवकरच इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, लोणावळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 25 तासांत सुमारे 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट भागांसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे.

धरणात सध्या ९.९८ टीएमसी पाणीसाठा असून त्यात सुमारे १.७४ टीएमसी अधिक पाणीसाठा होऊ शकतो. मुसळधार पावसाच्या सतर्कतेमुळे धरण जलद भरण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. इंद्रायणी नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना लवकरच नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.