Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरात डेंग्युचे ८२, चिकुनगुण्याचे १० तर झिकाचे ०५ रुग्ण

पिंपरी चिंचवड शहरात डेंग्युचे ८२, चिकुनगुण्याचे १० तर झिकाचे ०५ रुग्ण

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराचे आज अखेर ८२ रुग्ण, चिकुनगुण्या आजाराचे १० रुग्ण व झिका आजाराचे ०५ रुग्ण आढळुन आलेले आहेत. या रुग्णांपैकी ०३ रुग्ण गर्भवती महिला आहे. तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यु या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे इ. त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

डेंग्यु मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत दिनांक १८.०८.२०२४ रोजी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या घरी साफसफाई व डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही केली उदा. ठाकरे शाळा रुपीनगर,संत पीटर शाळा रुपीनगर,गवळी शाळा सहयोगनगर,ज्ञानदीप शाळा यमुनानगर, सनशाइन शाळा यमुनानगर,नवमहाराष्ट्र शाळा,स्वामी विवेकानंद शाळा,प्रगती शाळा नेहरूनगर,अप्पा भानसे शाळा रुपीनगर, संस्कार नर्सरी त्रिवेणीनगर,स्टारकिड्स नर्सरी तळवडे,अंतोजी भालेकर शाळा तळवडे,शिवछत्रपती शाळा तुकारामनगर, प्राथमिक विद्यालय राहुलनगर,काळभोर गोठा शाळा,महर्षी विद्या मंदिर इंग्लिश मेडीअम शाळा,पि.सी.एम.सी.शाळा काळेवाडी गावठाण,जय भवानी शाळा मोहननगर,संत साई इंग्लिश मेडीअम शाळा भोसरी,पि.सी.एम.सी.शाळा चिखली, रहाटणी शाळा क्र ५५,पि.सी.एम.सी.शाळा चिखली पवनानगर,मोर्डेन हायस्कूल निगडी, लर्नइवेर्स प्री स्कूल तळवडे, लिटील अंजल नर्सरी ताम्हानेवस्ती,रहाटणी कन्या शाळा,अण्णासाहेब मगर शाळा पिंपरी,पि.सी.एम.सी.शाळा काळभोरनगर,कै. फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा आकुर्डी,इदूकिड्स स्कूल रहाटणी,पार्वती स्कूल पिंपरी,जय हिंद स्कूल पिंपरी,रोजेस स्कूल पिंपरी,LBT स्कूल तापकीरनगर,डेलमोंट स्कूल पिंपरी,कोकोमिलोन किड्स,श्रीनगर,christeria स्कूल से.न.२५ इत्यादी.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा ताप व इतर डेंग्यू व इतर किटकजन्य आजाराची लक्षणे असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments