Friday, June 13, 2025
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरातील ८१ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला , सिरो सर्वेचा...

पिंपरी चिंचवड शहरातील ८१ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला , सिरो सर्वेचा अहवाल

३ जूलै २०२१,
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १६ ते २६ जुन या कालावधीमध्ये शहरामध्ये दहा हजार नागरीकांमध्ये अँटीबॉडीज टेस्टींग (SeroSurvillance) करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज टेस्टींग (SeroSurvillance) करणारी पहिली महानगरपालिका आहे. त्यामुध्ये खालील अहवाल प्राप्त झालेला आहे.

संपुर्ण शहरामध्ये तयार करण्यात आलेल्या २०० क्लस्टर्स मध्ये सरासरी ८१.४०% कोविड अँटीबॉडीज नागरीकांमध्ये दिसून आलेल्या आहेत. शहरामध्ये झोपडपट्टी (८२.५%), गावठाण (८४.५%), व सोसायट्यामध्ये (८०%), साधारणत: सारख्या प्रमाणात अँटीबॉडीज दिसुन आलेल्या आहेत. महिला (८१.५%), व पुरुषामध्ये (८१.३%), अँटीबॉडीज असण्याचे प्रमाण साधारणत: सारखेच दिसुन आलेले आहे.

वयोगटानुसार सुध्दा साधारणत: अँटीबॉडीजचे प्रमाण सारखे आहे,
६ ते १८ वर्षे वयोगटामध्ये – (७०.६%),१९ ते ४४ वर्षे वयोगटामध्ये – (७८.९%), ४५ते ६० वर्षे वयोगटामध्ये – (९१.१%), ६० वर्षावरील वयोगटामध्ये – (९०.५%)

वरील प्रमाणे अँटीबॉडीजचे प्रमाण हे शहरामध्ये असले तरी देखील बदलत्या स्वरुपात येणारा कोरोना व्हायरस (डेल्टा) याच्यावर सदर अँटीबॉडीजचा प्रभाव किती प्रमाणात आहे या बाबत तज्ञाकडे कोणत्याही प्रकारचा ठोस अनुमान नाही. त्यामुळे अँटीबॉडीजचे प्रमाण शहरामध्ये दिसुन आले असले तरी नागरीकांनी कोविड विषयक शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे(उदा.मास्क वापारणे, सामाजिक आंतरभारण राखणे, वेळोवेळी हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे इ.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments