पिंपरी चिंचवड शहरातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना महिला व बाल कल्याण योजनेच्या माध्यमातून सायकल खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ७ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण या योजनेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील खासगी आणि महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या ८ वी ते १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ७ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
महिला व बाल कल्याण योजनेचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. तरी लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती –
· या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना मागील वर्षी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
· प्रमाणपत्रावर सरासरी श्रेयांक पद्धतीने गुण (सीजीपीए) उपलब्ध असतील तर सरासरी श्रेयांक गुण (सीजीपीए) ५.३ एवढे असणे आवश्यक आहे.
· पिंपरी चिंचवड हद्दीतील लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
· अर्जदाराने आधारकार्डची प्रत आणि पालकांचे मतदान कार्ड किंवा मतदान यादीची प्रत जोडणे बंधनकारक आहे.
· लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
· ऑनलाईन अर्ज भरताना तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा रेशनकार्ड जोडावे.
· अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असून विभागात आलेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार ना