पी.एम.पी.एम.एल.ची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन महापालिकेच्या वतीने त्यांना ६० कोटी इतकी रक्कम देण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ८१ कोटी ६४ लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची ऑनलाइन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.१४ आकुर्डी गावठाणमधील नविन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर मधील आवश्यक विद्युत विषयक व अनुषंगिक कामे करणेकामी र.रु. १ कोटी ८८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
माझी वसुंधरा अभियान आंतर्गत मनपा क्षेत्रात पर्यावरण जनजागृतीकामी आकर्षक वॉल पेंटिंग,बोर्ड,फ्लेक्स बसविणे याकामी येणाऱ्या र.रु.५४ लाख ८६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१२, ताम्हाणेवस्ती त्रिवेणीनगर येथे स्थापत्य विषयक कामे करून पेव्हींग ब्लाँक बसविणे याकामी येणाऱ्या र.रु.३३ लाख ७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२, रुपीनगर येथिल अरुंद गल्यांमधील रस्ते पेव्हींग ब्लाँकने तयार करणे याकामी येणाऱ्या र.रु.३६ लाख ६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.०५, मधील अत्याधुनिक पध्दतीने रस्ते विकसीत करणे व स्थापत्य विषयक कामे करणे याकामी येणाऱ्या र.रु. ४४ लाख ५८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील विद्युतीकरणाची वार्षिक पध्दतीने देखभाल दुरुस्ती करणे याकामी येणाऱ्या र.रु. २७ लाख ५४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१५, मधील दक्षिणमुखी मारुती उदयानाचे नुतनीकरण करणे याकामी येणाऱ्या ४५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.