Saturday, April 11, 2026
Homeताजी बातमीमहाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.64 टक्के मतदान ; जाणून घ्या मतदानासंदर्भातील बातम्यांचा...

महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.64 टक्के मतदान ; जाणून घ्या मतदानासंदर्भातील बातम्यांचा आढावा

देशात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज. महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार…

यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे.

गुजरातमधील सर्व 25 जागांवर आज मतदान होईल. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकलीय. महाराष्ट्रात 11 जागांवर, उत्तर प्रदेशात 10 जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित 14 जागा, छत्तीसगडमधील 7, मध्य प्रदेशातल्या 8, बिहारमधील 5, आसाममधील 4 तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही आज मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात ढकलण्यात आलंय. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments