Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमीकर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी, पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी निलंबित; पोलिस उपायुक्तांची मोठी...

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी, पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी निलंबित; पोलिस उपायुक्तांची मोठी कारवाई

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी डेक्कन वाहतूक विभागातील तीन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. वाहतूक कोंडी झाली असताना वाहतुकीचं नियमनाचं काम नाही, तर तीन पोलिस एकत्र कारवाई करताना दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या नावाची प्लेटदेखील झाकली होती. ही बाब लक्षात येताच पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या निलंबणाचे आदेश काढले आहेत. जयशिंग यशवंत बोराणे, जितेंद्र दत्तात्रय भागवत, गोरख मारुती शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या हवालदारांची नावे आहेत.

गणेशोत्सवात पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक पोलिस रस्त्यांवर कारवाई करताना दिसतात. वाहतूक कोंडी सोडवणे आणि रस्ता मोकळा करुन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची जबाबदारी या वाहतूक पोलिसांवर असते. मात्र हे तिघेही वाहतूक कोंडी सोडवताना न दिसता एका ठिकाणी तिघेही कारवाई करताना आढळले आणि हे सगळं लक्षात येताच थेट कारवाई केली.

पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर हे 16 सप्टेंबरला जंगली महाराज रस्त्यावरुन जात होते. त्याचवेळी त्यांनी पोलिसांना वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ते लॉ कॉलेज रोडवरुन जात असताना त्यांनी वाहतूक नियमन सोडून एकत्र कारवाई करताना दिसले होते. त्यावेळी एका पोलीस हवालदाराने आयक्तांना पाहून गाडी काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांचंही आता निलंबन करण्यात आलं आहे.

पुणे पोलिस अॅक्शन मोडवर…

पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलीस नक्की काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments