Thursday, January 16, 2025
Homeउद्योगजगतअग्रोदय अधिवेशनात 28 व्यक्तींचा पुरस्काराने गौरव…

अग्रोदय अधिवेशनात 28 व्यक्तींचा पुरस्काराने गौरव…

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महाराष्ट्रातील 28 व्यक्ती व संस्थांचा आज 25 डिसेंबर रोजी पुणे येथील अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात सत्कार करण्यात आला. या मध्ये सर्वोच्च अग्र शिरोमणी पुरस्कार घनश्यामदास चुन्नीलाल गोयल (जालना), पवन सराफ (पुणे) आणि सुरेश ओंकारदास अग्रवाल (जालना) यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष गोपाल शरण गर्ग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनूप गुप्ता, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अग्रवाल समाज महासंघाचे कृष्णकुमार गोयल (कोहिनूर ग्रुप), जयप्रकाश गोयल (गोयलगंगा ग्रुप), सुनील अग्रवाल (अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अग्रवाल ग्लोबल फाऊंडेशन, मुंबई/लोणावळा यांना अग्र सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अग्रवाल गरिमा पुरस्कार सुनील ओमप्रकाश देवरा (हिंगोली), विनोद रमणलाल डिडवानिया (खामगाव), मोहनलाल मन्नालाली अग्रवाल (वर्धा), शैलेश पुरषोत्तम दास बागला (चंद्रपूर), चंद्रकुमार मधुसूदन जाजोदिया (अमरावती), सुरेश गोवर्धनदास अगरवाल (दिपवाल), डॉ. गर्ग, (औरंगाबाद), संजय काशिनाथ अग्रवाल (धुलिया), नितीन विश्वनाथ अग्रवाल (लोणावळा), अरुणकुमार जयदयाल गोयंका (इचलकरंजी), महेश मंगेश अग्रवाल (नाशिक), अशोक रामस्वरूप गोयल (नागपूर), अग्र माता माधवी कुमार रुसकर अशोक कुमार शेकडो कर्मचारी. (मुंबई), सौ. मंगला अशोककुमार लोहिया (नागपूर), कु. सविता नरबदप्रसाद अग्रवाल (हिंगोली), श्रीमती उर्मिला रमेशचंद्र जी. अग्रवाल (नागपूर), अग्र युवारत्न गौरव पुरस्काराने सौ.शांतीदेवी ओमप्रकाश अग्रवाल (पनवेल) व अनिल प्रेमचंद्र मित्तल (पुणे), डॉ.पूजा रमाकांत खेतान (अकोला), श्री.सिद्धांत सतीशचंद्र टावरवाला (जालना), अग्र श्रद्धासुमन पुरस्काराने श्री जमनाली श्री राम गोयनका (अकोला), कै. श्री योगेश जुगमंदर अग्रवाल (पुणे), पद्मश्री डॉ.अशोक गुप्ता, (मुंबई) अग्र मनिषी पुरस्काराने, कु कनक शशिकांत नांगलिया (अमरावती), उमेश खेतान (अकोला) यांना अग्र चिरायू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयोजन समितीला प्राप्त झालेल्या एकूण 128 नामांकनांपैकी 28 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.अग्र गरिमा सन्मान, अग्र माता माधवी सन्मान, अग्रयुवारत्न गौरव सन्मान, अग्रश्रद्धासुमन सन्मान, अग्रमनिषी सन्मान आणि अग्रचिरायु सन्मान अशा विविध श्रेणींमध्ये हा सन्मान देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments