Tuesday, December 5, 2023
Homeराजकारणचिखली येथील संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी स्थायी समितीची २२ कोटी रुपयांची मान्यता

चिखली येथील संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी स्थायी समितीची २२ कोटी रुपयांची मान्यता

चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे दुसऱ्या टप्प्याचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यासाठी 21 कोटी 88 लाख 44 हजार 718 रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

संतपीठामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेसोबत संतसाहित्य व वाड्‌मयाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच,याशिवाय विविध वाद्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी निवास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संतपीठाचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. संतपीठाचे कामकाज नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळामार्फत केले जात आहे.

येथील दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी स्थापत्य फ मुख्यालयाने 23 कोटी 54 लाख 1 हजार 274 रूपये खर्चाची निविदा काढली होती. त्यासाठी बी. के. खोसे, एस. एस. साठे व अजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. अशा तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. खोसे यांची 7.09 टक्के कमी दराची 21 कोटी 88 लाख 44 हजार 718 रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. कामाचा कालावधी दीड वर्षे आहे. या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments