महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्याबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही याच दिवशी होत आहे.
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारचं भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
यावेळची विधानसभा निवडणूक आणि प्रचार चांगलाच गाजला. आरोप-प्रत्यारोप, हल्लाबोल आणि प्रचार सभांमुळे वातावरण ढवळून निघाले. या प्रचारात सर्वच पक्षांनी जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांची संपत्ती आणि त्यांची पार्श्वभूमी चकीत करणारी आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र दिलं त्या शपथपत्रांचा अभ्यास करून Association for Democratic Reforms (ADR) या संस्थेने काही निष्कर्ष काढले आहेत. त्यावरून सर्व उमेदवारांमधले 1 हजार उमेदवार कोट्यधीश असून तब्बल 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपांचे खटले दाखल अाहेत अशी माहिती पुढे आलीय.
विधानसभा निवडणूक 2019 ची आकडेवारी (स्त्रोत – निवडणूक आयोग)
महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 12 कोटी 43 लाख 26 हजार
पुरुष 6 कोटी 51 लाख 33 हजार 708
महिला 5 कोटी 91 लाख 92 हजार 292
एकूण मतदारसंघ 288
मतदान केंद्र 96 हजार 661
पुरूष उमेदवार 3 हजार 237
महिला उमेदवार 235
तृतीयपंथीय उमेदवार 1
एकूण मतदार -8 कोटी 97 लाख 22 हजार 19
पुरुष-4 कोटी 68 लाख 75 हजार 750
महिला-4 कोटी 28 लाख 43 हजार 635
तृतीयपंथीय-2 हजार 634
अनिवासी भारतीय-5 हजार 560
पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
अ.क्र. पक्ष एकूण उमेदवार
1. बहुजन समाज पक्ष 262
2. भारतीय जनता पक्ष 164
3. काँग्रेस 147
4. शिवसेना 126
5. राष्ट्रवादी काँग्रेस 121
6. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 101
7. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 16
8. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 8
9 वंचित बहूजन आघाडी २88
9. अपक्ष 1400
10. इतर 892