14 November 2020.
पाकिस्तानच्या गोळीबारात बहिरेवाडीचा जवान शहीद पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.
जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली.
ऋषिकेश जोंधळे सीमेवर शहीद झाल्याचे कळताच गावकऱ्यांना धक्का बसला.केवळ दोन वर्ष सेवा बजावलेल्या जवान ऋषिकेश शहीद झाला. बेळगाव येथे भरती झाल्यानंतर तो जम्मू – काश्मीर येथे सेवा बजावत होता.
शुक्रवारी पहाटे पूँछ जिल्हयाच्या सवजियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात येत होता. शस्त्रसंधीचे उल्लंघन पाक सैन्याकडून सुरू होते.भारतीय सैन्यांनी पाक सैनिकांना चोख उत्तर दिले.