Monday, July 14, 2025
Homeबातम्याअजित पवार गटाच्या २० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब ,संभाव्य यादी समोर

अजित पवार गटाच्या २० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब ,संभाव्य यादी समोर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी

बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
परळी – धनंजय मुंडे
कागल- हसन मुश्रीफ
दिंडोरी – नरहरी झिरवळ
रायगड – अदिती तटकरे
अहमदनगर – संग्राम जगताप
खेड – दिलीप मोहिते-पाटील
अहेरी- बाबा अत्राम
कळवण -नितीन पवार
इंदापूर – दत्ता भरणे
उदगीर- संजय बनसोडेट
पुसद – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिंपरी – अण्णा बनसोडे
मावळ – सुनील शेळके
अमळनेर- अनिल पाटील
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव-शेरी – सुनील टिंगरे

अजित पवारांकडून मुख्यमंत्रिपदाची मागणी

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments