वाढत्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेची स्थिती निर्माण होत आहे. याच कोरोनाच्या संसर्गाचा फटका मनोरंजन क्षेत्रालादेखील बसतोय. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आलिया भट्ट, अक्षय कुमार, भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला कोरोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला आहे, ” मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिविव्ह आली. सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी ही विनंती, काळजी घ्या. ” अशी पोस्ट करत प्रियदर्शनने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी चिंता व्यक्त करत काळजी घेण्यास सांगितलं आहे.

प्रियदर्शन जाधव सध्या ‘लव्ह सुलभ’ या सिनेमाचं काम करत होता. या सिनेमात प्रियदर्शन लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.